लाजली सीता स्वयंवराला,Lajali Sita Svayamvarala

पाहुनी रघुनंदन सावळा
लाजली सीता स्वयंवराला

नक्षीदार अति रम्य मंडपी
जमली सारी थोर मंडळी
उभी जानकी जनकाजवळी
घेउनी, धवल फुलांची माला

धनुष्यास त्या दोर लावण्या
शूर पुरुष तो कुणी धजेना
काय करावे काहि सुचेना
न्याहळी, दुरुनी श्रीरामाला

मुनीवरांना मान देउनी
उठले रघुविर असे पाहुनी
मनासारखे येता जुळुनी
नाचते, हर्षभराने मिथिला

No comments:

Post a Comment