पत्र तुझे ते येता अवचित
लाली गाली खुलते नकळत
साधे सोपे पत्र सुनेरी
नकळे, क्षणभर ठेवु कुठे मी
शब्दोशब्दी प्रीत हासरी
लाज मनाला, मी शरणागत
आजवरी जे बोलु न शकले
शब्दांवाचुन तू ओळखले
गीत लाजरे ओठावरले
गुणगुणते मी नयनी गिरवत
वेळिअवेळी झोपेमधुनी
जागी होते मी बावरुनी
खुळ्या मनीचा भास जाणुनी
गूज मनीचे हृदयी लपवित
No comments:
Post a Comment