मुकुंदा रुसू नको इतुका,Mukunda Rusu Nako Ituka

मुकुंदा, रुसू नको इतुका
विनविते तुझी तुला राधिका

तुझ्या मुरलिला आतुरलेली
गवळ्याची मी गौळण भोळी
तू माझा, मी तुझी सावली
नको रे, राग धरू लटका

खिन्न होऊनी तुझियासाठी
नाच थांबला, यमुनाकाठी
गोपिनाथ तू, तुझ्याभोवती
जमल्या साऱ्या या गोपिका

पुन्हा एकदा पहा विचारुनि
तुझे तुला तू मनापासुनी
तू नाही, तर तुझ्यावाचुनी
मंजुळ नाद येइल का ?