मज सांग सखे तू सांग,Maj Sanga Sakhe Tu Sang

मज सांग सखे तू सांग मला
पत्रात लिहू मी काय तुला ?

चंद्रमुखी तू चांद म्हणू तर
प्रिये म्हणू का तुज घटकाभर
रूप तुझे गिरवीत निरंतर,
शब्द सुचेना काहि मला

किंचित हसऱ्या तव नजरेवर
लाज बावरी, रूप मनोहर
नजरानजरी मीही क्षणभर,
अर्थ मनीचा जाणियला

लिहितालिहिता शब्द थांबती
लिहू नये तर कसली प्रीती
नाव सारखे ओठांवरती,
वेड लाविते जीवाला

No comments:

Post a Comment