नको भव्य वाडा, नको गाडि-घोडा
अनाडी असे मी, तुझा प्रेमवेडा
तुझ्या आणि माझ्या घडू दे ना भेटी
तुला या दिलाची, येईल कसोटी
बेहोश मन हे तुझा त्यास ओढा
मला वाचु दे ना तुझी नेत्रभाषा
किती काळ सोसू उरी मी निराशा
बेचैन हृदया तू दे धीर थोडा
तुझ्या संगतीची जिवा ओढ भारी
हे देवी तुझा मी असे ग पुजारी
नाजूक दिल हे नको ना बखेडा
No comments:
Post a Comment