Showing posts with label S-शोभा गुर्टू. Show all posts
Showing posts with label S-शोभा गुर्टू. Show all posts

रे नंदलाला तू छेडू,Re Nandalala Tu Chedu

रे नंदलाला तू छेडू नको
धरुनीया पदराला ओढू नको

सांजवेळ झाली घरी जाऊ दे ना
नको बासरीच्या घेऊस ताना
शब्द लाघवी काना बालू नको

अडवू नको रे नभी चंद्र आला
आवरुनी घे ना तुझ्या बाललीला
मला मोहमायेने वेढू नको

माझिया प्रियाला प्रीत,Majhiya Priyala Preet

माझिया प्रियाला प्रीत कळेना
अनुराग त्याचा माझा, हाय रे जुळेना

पावसात भिजतो श्रावण, सुखाचा महिना
आवरू मनाला कैसे मला ते जमेना
मुकी नेत्रभाषा त्याला कळूनी वळेना

यौवनात सुकते काया, दुःख आवरेना
वेदना उरीची छेडी मुक्या भावनांना
स्पर्श गोड अजुनी त्याचा सुखाचा मिळेना

वसंतात नाही बोले, श्रावणात नाही
कठोरास माझ्या मनिचे कळेनाच काही
रात रात शिणती डोळे, पापणी ढळेना

बोल कन्हैय्या का रुसला,Bol Kanhaiyya Ka Rusala

बोल कन्हैय्या, का रुसला, राधेवरी ?

तू अनुरागा भारी चंचल
जैसे वाहे यमुनेचे जल
का रे धरिसी लटक्या रागा ?

तुझ्यामुळे बदनामी झाली
नेत्र-पापण्या झुकल्या खाली
सोडी ना रे अपुला त्रागा ?



पिकल्या पानाचा देठ,Pikalya Panacha Deth

दरबार जुना ह्यो हंड्या झुंबर नवं
मध्यान्ह रातीला आता लावा अत्तर दिवं
अंगाअंगी मी रंग खेळते, केसामधी मरवा
पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा !

नख लागंल बेतानं खुडा
केशरी चुना अन्‌ कात केवडा

लई दिसानं रंगल्‌ विडा
व्हटाची लाली टिपुनी घ्याया
मुखडा असा फिरवा
पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा !

थोडी झुकून थोडी वाकते
पडला पदर, लाज झाकते
नेम धरून बाण फेकते
तुमची माझी हौस इश्काची
हळू हळू पुरवा
पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा !



पाहुनी प्यारभरी मुसकान,Pahuni Pyarbhari Muskan

पाहुनी प्यारभरी मुसकान
तुझ्यावर जान करीन कुर्बान

किती झेलू मी गहिऱ्या नजरा
किती फुलांचा गुंफू गजरा
मी अदबीने करिते मुजरा झुकवून थोडी मान

लाज लाजतो गोरा मुखडा
हात लपविती काळीज तुकडा
असा बसविते अंमल करडा फेकून तीर कमान



त्यानीच छेडिले ग,Tyanich Chedile Ga

त्यानीच छेडिले ग, माझ्या मनी न होते
ओढून ओढणीला, दारी उभी मि होते

करपाश तोचि आले, कंठी गडे तयांचे
भारावल्या मनाने, मी ग अबोल होते

अपराध काहि नसता, शिक्षा मला मिळाली
माझ्याच मंदिरी ग, मी बंदिवान होते

दिनरात साजणाचे, बेबंद वागणे हे
असते सुखात जर का, मी बालिकाच होते

तुझी सूरत मनात राया,Tujhi Surat Manat Raya

तुझी सूरत मनात राया भरली रे
डाव्या डोळ्यात छबी तुझी कोरली

काल सांजच्यापारी उभी होते दारी

रान वाऱ्यावरी हो रान वाऱ्यावरी
तुझ्या ओठांतली शीळ भिरभिरली

रूप तुझं पाहून मना गेलं मोहून

अन्‌ राहून बाई राहून राहून
दिठी तुझ्याच मागं मागं फिरली

नवतीची कळा वय माझं सोळा
स्वभाव साधा भोळा ग बाई साधा भोळा
दोन्ही गालांवर लाज थरथरली

उघड्या पुन्हा जहाल्या,Ughadya Punha Jahalya

उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या
फुलती तुझ्या स्मृतींच्या, कलिका मनातल्या

येऊ कशी निघोनी, पाऊल अडखळे
विरहात वेचिताना, घटना सुखातल्या

उठता तरंग देही, हळुवार भावनांचे
स्मरतात त्या अजूनी, भेटी वनातल्या

हासोनिया खुणावी, ती रात रंगलेली
तू मोजिल्यास होत्या, तारा नभांतल्या

अहो जाईजुईच्या फुला,Aho JaiJuichya Phula

अहो जाईजुईच्या फुला
जरा हसुन माझ्यासंगं बोला
जीवघेणा पुरे हा अबोला
काय अगळिक सांगा तरि घडली ?
माझी माया कशी, हो, तुम्ही तोडली ?

गोरा गोरा हो तुमचा रंग
पिकलं लिंबू नितळ तसं अंग

चोळी ल्याले गझनाची तंग
लाल शालूची आज घडी मोडली
माझी माया कशी, हो, तुम्ही तोडली ?

चांद पुनवेचा वर सरकला
मोगरा शेजेवर सुकला
ताटकळून जीव राया थकला
घ्या हो मिठीत, काया अवघडली !
माझी माया कशी, हो, तुम्ही तोडली ?

अधीर याद तुझी, Adhir Yaad Tujhi

अधीर याद तुझी, जाळितसे रे दिलवर
अशीच वाट तुझी, पाहु किती मी दिलवर ?

तमात चंद्र फुले, रात रुपेरी हसते
फुलून हासु कशी, एकटीच मी दिलवर ?

ते स्वप्न आज निखाऱ्यांत जहाले घायल्‌
हवा तुझाच बसंती, बहार रे दिलवर्‌

मदीर ध्यास तुझा, छेडितसे या हृदया
बहाल जन्म अता, तुजवरती रे दिलवर्‌