तुझेच रूप सखे पाहूनिया,Tujhech Roop Sakhe

तुझेच रूप सखे पाहूनिया फसलो ग
असेल चूक ही, मी यौवनात चुकलो ग !

सारी सारी रात मनी येऊनी तू छळसी का ?
ही तुझी हार सखे
मम हृदयात तूच फिरुनी फिरुनी बघसी का ?
ही तुझी हार सखे
गुलाबी रंग तुझा पाहुनिया भुललो ग
असेल चूक ही मी यौवनात चुकलो ग !

अनुपम नेत्र तुझे रोखूनिया हससी का ?
ही तुझी हार सखे
झुलवूनी रोज मला दूर दूर पळसी का ?
ही तुझी हार सखे
ऊरात हट्ट तुझे घेऊनिया बसलो ग
असेल चूक ही मी यौवनात चुकलो ग !

No comments:

Post a Comment