माझ्या विराण हृदयी,Majhya Viran Hridayi

माझ्या विराण हृदयी पाहू नकात कोणी
आहे अजून ओली इष्कातली निशाणी

उधळूनी डाव गेला धुंदीत खेळलेला
सहवास यौवनाचा, लाभून यौवनाला
आता मुक्या स्मृतीने जळते उभी जवानी

बेहोष होऊनिया हितगूज जेथ केले
निमिषात त्या ठिकाणी सारे मिटून गेले
आता अखंड वाहे डोळ्यांमधून पाणी

मस्तीत प्रियतमेने ज्या फेकिले फुलाला
दळभार त्या फुलाचा सारा सुकून गेला
आणि तरी तयाला येतोच गंध अजुनी