माझे माहेर पंढरी,Majhe Maher Pandhari

माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी ॥१॥
बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥
पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू ॥३॥
माझी बहीण चंद्रभागा, करितसे पाप भंगा ॥४॥
एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण ॥५॥No comments:

Post a Comment