चंद्राविना झुरावी जशी पौर्णिमा निरर्थ
आयुष्यही तसे हे प्रेमाशिवाय व्यर्थ !
झेपावतात लाटा चंद्रास भेटण्यासी
विजनी वसंत येता आल्हाद कोकिळेसी
मधुमालती जशी गंधाविना निरर्थ
आयुष्यही तसे हे प्रेमाशिवाय व्यर्थ !
दुरुनि खुणावते ती कलिका कुणास सांगा
भ्रमरांचिया थव्यांनी फुलतात रम्य बागा
स्वाति जलाविना रे शिंपा जसा निरर्थ
आयुष्यही तसे हे प्रेमाशिवाय व्यर्थ !
No comments:
Post a Comment