SNAN KARITI LOCHANE स्‍नान करिती लोचने

स्‍नान करिती लोचने, अश्रुंनी पुन्हापुन्हा
शेषशयन श्रीधरा दृष्टी अधिर दर्शना

नील या नभाकडे मी भुलून पाहते
मीन होऊनी तनू निळ्या जळात पोहते
नील कमल पाहता तूच भाससी मना

तुझाच श्वास झेलुनी वसंत गंध उधळितो
तुझेच तेज घेऊनी सूर्य विश्व उजळितो
तुझे स्वरूप रेखिता मूक होई कल्पना

लोचनांस लागले वेड रे निळेनिळे
दृष्टी रूप रंगवी तुझे सुरम्य सांवळे
जन्मपूष्प हे फुले प्रिया तुझ्याच पूजना


Lyrics -ग. दि. माडगूळकर G.D. MADAGULAKAR
Music -वसंत देसाई VASANT DESAI
Singer -आशा भोसले AASHA BHOSALE
Movie / Natak / Album -स्वयंवर झाले सीतेचे SWAYAMWAR ZALE SEETECHE

No comments:

Post a Comment