सावज माझं गवसलं,Savaj Majhe Gavasala

सावज माझं गवसलं
सावज माझं गवसलं ॥

अरे अरे सावजा विसरू नको
उगाच गमजा करू नको
तीर सरासर माझा सुटता
कुणीच नाही ग बचावलं ॥

पार्वतीच्या शंकरानं
गिरिजेच्या गिरीशानं
दुर्गेच्या ग दुर्गेशानं
माझ्यावरी कृपा केली ॥

लखलख लखलख माझा बाण
करील तुझी रे दाणादाण्‌
मदन-धनूच्या बाणालाही
जयानं चटकन्‌ हरवलं ॥

अशी तशी मी नसे कुणी
मी वनराणी रूपखनी
रस राजाने नवीन यौवन
तनमन माझं सजवलं ॥

No comments:

Post a Comment