सांगा मुकुंद कुणि हा,Sanga Mukund Kuni Ha

सांगा मुकुंद कुणि हा पाहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला

रासक्रीडा करिता वनमाळी हो,
सखे होतो आम्ही विषयविचारी
टाकुनि गेला तो गिरिधारी
कुठे गुंतून बाई हा राहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला

गोपी आळविती, हे ब्रजभूषणा हे
वियोग आम्हालागी तुझा ना साहे
भावबळे वनिता व्रजाच्या हो
बोलावुनि सुताप्रती नंदाजीच्या
प्रेमपदी यदुकुळटिळकाच्या
म्हणे होनाजी, देह हा वाहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला