श्वानाहुनि अति नीच,Shvanahuni Ati Neech

श्वानाहुनि अति नीच तुम्ही रे, स्वार्था मांजरसे टपतां ।
जंबुकगुरु जनवंचनकामीं । साधुबकापरि वरि दिसतां ॥

वेदशास्त्रसंपन्न म्हणवितां । केलि मुखोद्गत ती गीता ।
तत्व तयांतिल कळे हेंच का । सत्यपराङमुख कां होतां ॥

श्वान नाचतें पुच्छ घोळितें, चाटि अंग तुकड्याकरितां ।
तसें नाचतां आर्जव करितां, रुचे समर्था तें वदतां ॥

तो म्हणे अश्व वृषभाला । तुम्ही मान तुकवितां त्याला ।
तो म्हणे अहो रवि मेला । लावितां पदर डोळ्यांला ।
मी कसा तरुण रंगेला । म्हणतांच मदन अवतरला ।
नरनंदी हे लक्ष्मीनंदन । त्यांत भोंवतीं तुम्हि जमतां ।
श्वान काक बक ढोंगी सोंगी । दिवटी त्याच्या करि देतां ॥

No comments:

Post a Comment