एकलेपणाची आग लागली हृदया
घनदाट दाटली विषण्णतेची छाया
तडफडे जिवाचे पाखरूं केविलवाणे
होत ना सहन त्या एकलकोंडे जगणे
जोडीस शोधी ते उदात्त अपुल्यावाणी
प्रतिशब्द जिवाचा न दिला अजुनी कोणी
गुंफीत कल्पनाजाला गुंगणे
गुरफटुन त्यात जीवाला टाकणे
रंगीत स्वप्नसृष्टिला उठविणे
ही स्वप्नसृष्टि पटतसे जिवाला वेड्या
ही सुवर्णलंका दिपवित अवघी हृदया
परि इंद्रजाल हे जात कधी विरुनीया
एकलेपणाची आग लागते हृदया
No comments:
Post a Comment