नको वळुन बघू माघारी
जा रे खुशाल दर्यावरी
तुझ्या नि माझ्या प्रीतीची रे संगती
घेऊन शिदोरी आठवणींची
तुझी लाडकी उनाड होडी
बघुन समिंदर होइल वेडी
आणि तयाला कवळायाला सारखी घेइल उडी
त्या क्षणी याद तुला येऊन माझी जाशिल कळवळुनी
नाही सोबती तुझ्या संगती
एकटाच तू दर्यावरती
बघुन तुला रे येतिल वरती रत्नं सुंदर किती
त्यामधे नाही तुझी राणी, पाहुनी होशिल खिन्न मनी
कशी खुळी ती आभाळातुनी
नक्षत्रं ही तुला हेरूनी
डोळे मोडुनि नाचुनी चमकुनी
येतिल खाली जरी रे
आठवेल रे झोपडीतली मिणमिणती चांदणी
No comments:
Post a Comment