'तू माझी अन् तुझा मीच' ही खातर ना जोवरी
प्रीतिची हूल फुकट ना तरी !
गालाला पडते खळी मला पाहुनी
ही नजर पाहते धरणी न्याहाळुनी
भयभीत प्रीत थरकते लीन लोचनी
ओठांची थरथरत पाकळी बोल गडे झडकरी
प्रीतिची हूल फुकट ना तरी?
जिवाजिवांची अभंग जडली जोड असे ही जरी
भीति मग कोणाची अंतरी
ही गाठ भिडेची तात गळ्यां लाविल
हिरव्याची पिवळी पाने ही होतिल
प्रीतिच्या फुलांचा वास उडुनि जाईल
फसाल पुरत्या बसाल गाळित घळघळ अश्रूझरी
प्रीतिची हूल फुकट ना तरी?
No comments:
Post a Comment