Showing posts with label कुंकू (१९३७). Show all posts
Showing posts with label कुंकू (१९३७). Show all posts

मन सुद्ध तुझं गोस्त,Man Suddha Tujhe Gosht

मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची

झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची

जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई
अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बि खाई
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची



भारती सृष्टीचे सौंदर्य,Bharati Srushtiche

भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे
दावीत सतत रूप आगळे

वसंत वनांत जनांत हासे
सृष्टीदेवी जणू नाचे उल्हासे
गातात संगीत पृथ्वीचे भाट
चैत्र-वैशाखाचा ऐसा हा थाट

ज्येष्ठ-आषाढात मेघांची दाटी
कडाडे चपला होतसे वृष्टी
घालाया सृष्टीला मंगल स्नान
पूर अमृताचा सांडे वरून
गगनी नर्तन कृष्ण मेघांचे
भूतली मयूर उत्तान नाचे

श्रावणी पाऊस हास्याचा पडे
श्रीकृष्ण-जन्माची दंगल उडे
बांधीती वृक्षांना रम्य हिंदोळे
कामिनी धरणी वैभवी लोळे



प्रभुराया रे हो संकट,Prabhuraya Re Ho Sankat

प्रभुराया रे हो संकट हे अनिवार

खवळूनि सागर गरजत नाचे चोहिकडे अंधार
फुटले तारू कुणा पुकारू जाईल कैसे पार?

स्थिरली नौका क्षणभर वाटे दाविशी साक्षात्कार
परि तो ठरला भास, उफाळति लाटा अपरंपार


पसरुनी निज कर लहरीरूपे न्या हो सागरपार
धावा धावा सदया देवा, कोण दुजा आधार?