Showing posts with label S-शांता आपटे. Show all posts
Showing posts with label S-शांता आपटे. Show all posts

प्रभुराया रे हो संकट,Prabhuraya Re Ho Sankat

प्रभुराया रे हो संकट हे अनिवार

खवळूनि सागर गरजत नाचे चोहिकडे अंधार
फुटले तारू कुणा पुकारू जाईल कैसे पार?

स्थिरली नौका क्षणभर वाटे दाविशी साक्षात्कार
परि तो ठरला भास, उफाळति लाटा अपरंपार


पसरुनी निज कर लहरीरूपे न्या हो सागरपार
धावा धावा सदया देवा, कोण दुजा आधार?

झर झर धार झरे,Zar Zar Dhar Zare

झर झर झर झर धार झरे
धार सुधेची कामधेनूची
भर भर भर भर कलश भरे

नंदनवन सम गमते गोकुळ
शान्तिसौख्यमय जीवन मंगल
वैभव-धन हे अमोल येथिल
धेनु, गोजिरी वासरे

हरीची मुरली वाजे मंजुळ
प्रमुदित करिते गोकुळ सारे



घेई रे सोनुल्या घास,Ghei Re Sonulya Ghas

घेई रे सोनुल्या घास प्रीतीचा
राहू दे हासरा चंद्र मुखाचा

हा चिमणीचा, हा मोराचा
हा बघ गोड किती अपुल्या कपिलेचा

घास हा प्रीतीचा वदनी जाऊ दे
पाहू दे विश्वरूप दिव्य त्या मधे

घास हरी जाई एक तुझ्या पोटी
लाभते शांती किती सकल जगाला



एक होता राजा,Ek Hota Raja

एक होता राजा, एक होती राणी
अचल तयांची अनुपम प्रीती

दिव्य तयांची सुंदर नगरी
दु:ख न तेथे वास करी

विटुनि आपुल्या सदना उतरे
स्वर्गसौख्य जणु भूमिवरी

बोले राणी, "मन्मन मोती"
राजा बोले, "मी मनचोर"

राणी बोले, "चंद्रिकाच मी"
बोले राजा, "मीहि चकोर"

प्रणयोद्यानी करिती क्रीडा
दंग नर्तनी हर्षभरे
नाचती लतिका, फुले, झरे