सावळ्या हरिचे घेइ सदा,Savalya Hariche Ghei Sada

सावळ्या हरिचे घेइ सदा नाम
तेणं तुझे काम पूर्ण करी

प्रल्हादाची भक्ती पाहुनी जो धावे
केशवा त्या ध्यावे, मनमंदिरी

चोखोबाचा भाव मानी सदा चोखा
तोच हरि देखा, घरोघरी

मानव्याचा ज्याला नित्य लागे ध्यास
हरि ही तयास हृदयी धरी