मज एक सारखे स्वप्न,Maj Ek Sarakhe Swapna

मज एक सारखे स्वप्न सख्याचे पडते
मी सुखद क्षणांची माळ अंतरी जपते

हा गंधित वारा गूज सांगतो गोड
लागली मनाला आज सख्याची ओढ
जळथेंब फुलावर त्यात सख्याला बघते

या प्रशांत समयी कोकिळ कूजन करिते
जात्यावर ओवी कुणी भाविका गाते
रविराज स्वागता उष:प्रभा ही नटते

बघ एकसारखी फडफडते पापणी
का हाक तयाची अवचित येते कानी
का संचित मजला जाण शुभाची देते

No comments:

Post a Comment