चल रानात सजणा
आंबेवनात जाउ या दूर
राया, गुपीत अपुलं फुटलं
जग भोंतीचं बोलत सुटलं
उठे काहूर, लागे हुरहूर
आंबेवनात जाउ या दूर
चांदण्याची पांघरुन शाल
लुटू आनंद धुंद खुशाल
बघु नवतीचा दुनियेचा नूर
आंबेवनात जाउ या दूर
नको संकोच भीति मनात
सख्या, जीवाचि चांदरात
दाटे प्रीतीचा रंगरस-पूर
आंबेवनात जाउ या दूर
जीवा-जीवाचि मंजूळ गाणीजीवा-जीवाचि प्रेमळ गाणी
बसू गात पाखरावाणी
फिरु गात पाखरावाणी
धरु प्रीतीचा एक ताल-सूर
आंबेवनात जाउ या दूर
No comments:
Post a Comment