जादुगारिणी सखे साजणी
थांब जराशी ग
प्रेमभाव नजरेत दाविले
तूच आधी मज नादि लाविले
गोड हसुनिया हृदयि फुलवल्या
गुलाब-राशी ग
तुझ्या संगती गिरिकंदरही
राजमंदिराहुन सुखदायी
तू माझी तर तुच्छ अवांतर
सौख्य-मिराशी ग
दोन जिवांचे जातक जुळले
भाग्यलेख प्रीतिने उजळले
जगास मानू उगा जुमानू
का ग्रहराशी ग
स्फूर्ति-तारका तू झगमगती
करू जोडिने प्रवास जगती
सदा बिलगली हीच एकली
आस उराशी ग
No comments:
Post a Comment