तू तिथे अन् मी इथे हा व्यर्थ झुरतो अंतरी
खवळला दुर्दैवसिंधू पसरला मध्यंतरी
मीलनाची या जिवाची भंगली आशा तरी

प्रीत आंधळी दिव्यगुणा, दावी मार्ग प्रेमी सुजना
भाव भोळा हा साजणा बंधना जुमानित ना

निशा दाटे जिवा लावित घोर, घनघोर
बघ उगवे चंद्रकोर
नाचवि जीव-चकोर

गुंफिते एकत्र सुमनां प्रीतबाला साजरी
जीव दोन्ही एक सखये, दूर देहाने जरी

No comments:
Post a Comment