मावळत्या किरणाचं पडे पाऊल दारात
झाली बाई सांजवेळ आल्या छाया अंगणात
परतला घरट्यात रानपाखरांचा थवा
लाविते ग सांजदिवा
चिमण्यांची चिविचव येई गोड चिंचेतून
रुणझुण वाजती ग संध्यादेवीचे पैंजण
जोजवितो मंद वारा अंकावरी बाळ जीवा
लाविते ग सांजदिवा
इवले हे निरांजन उजळते वृंदावन
तुळशीमाई वाहते ग भावभक्तिने हे मन
जोडुनिया दोन्ही हात आळविते जिवाभावा
लाविते ग सांजदिवा
माझ्या सुखी संसारात तूच मला भरवसा
लपिन ग तुझ्या कुशी तुला आईचा वारसा
ऊनपावसात आई मला जीवाचा विसावा
लाविते ग सांजदिवा
झाली बाई सांजवेळ आल्या छाया अंगणात
परतला घरट्यात रानपाखरांचा थवा
लाविते ग सांजदिवा
चिमण्यांची चिविचव येई गोड चिंचेतून
रुणझुण वाजती ग संध्यादेवीचे पैंजण
जोजवितो मंद वारा अंकावरी बाळ जीवा
लाविते ग सांजदिवा
इवले हे निरांजन उजळते वृंदावन
तुळशीमाई वाहते ग भावभक्तिने हे मन
जोडुनिया दोन्ही हात आळविते जिवाभावा
लाविते ग सांजदिवा
माझ्या सुखी संसारात तूच मला भरवसा
लपिन ग तुझ्या कुशी तुला आईचा वारसा
ऊनपावसात आई मला जीवाचा विसावा
लाविते ग सांजदिवा
No comments:
Post a Comment