दूर व्हा सजणा येऊ नका पुढे
मन माझे सजणी तुजवरी जडे
भिंतीला कान या बोलू नका बाई
नजरेनं सांगा हितगूज काही
धरु नका हात माझा पिचतील ना चुडे
मन माझे सजणी तुजवरी जडे
लालरंगी फूल तुझ्या गालावरी फुले
पहिली वहिली लाज माझी पाकळीत खुले
बघु नका डोळियांत पापणी ही उडे
मन माझे सजणी तुजवरी जडे
पाठमोरी नागीन ही केसाळ काळी
चाफ्याच्या मोहानं धुंदफुंद झाली
नका येऊ मागेमागे येऊ नका पुढे
मन माझे सजणी तुजवरी जडे
गोड तुझी मूर्त अशी एकदाच पाहू दे
पाहू नको मोहुनीया सोड मला जाऊ दे
बंडखोर पदर तुझा सोडू कसा गडे
मन माझे सजणी तुजवरी जडे
No comments:
Post a Comment