प्रीतीचा नव वसंत फुलला, हृदयांतरी खुलला
नव्या नवतीचा नवलाईचा, बाग दिलाचा दरवळला
पुरे प्रीतीचा छंद चाळा, जगावेगळा हा असला
नाजुक साजुक गोजिरवाणी, किती ग भोळी तू फुलराणी
प्रणय साज शृंगार साजणी, अंगारच जणू रसरसला
प्रियकर मधुकर धावुन येईल, रसिकराज मधुरुंजी घालिल
मंजुळ गुंजनि सदा रंगविल, ह्या हसऱ्या फुलराणीला
कुटिल भृंग रंगेल वृत्तीचा, लुटिल नवरसरंग नवतीचा
वंचिल चंचल निष्ठुर साचा, लोटिल विरहातमी कलिकेला
प्रेमळ कमळण चतुर धूर्तही, भृंगसख्याला कोंडिल हृदयी
सहजच तो मग अंकित होईल, जिंकित प्रेम जगाला
No comments:
Post a Comment