तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे ।
सगुण निर्गुण एकु गोविंदु रे ॥१॥
अनुमाने ना अनुमाने ना ।
श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥२॥
तुज स्थूळ म्हणों कीं सूक्ष्म रे ।
स्थूळसूक्ष्म एकु गोविंदु रे ॥३॥
तुज आकारू म्हणों कीं निराकारू रे ।
आकारूनिराकारू एकु गोविंदु रे ॥४॥
तुज दृश्य म्हणों कीं अदृश्य रे ।
दृश्याअदृश्य एकु गोविंदु रे ॥५॥
तुज व्यक्त म्हणों कीं अव्यक्तु रे ।
व्यक्त अव्यक्त एकु गोविंदु रे ॥६॥
निवृत्ती प्रसादें ज्ञानदेवो बोले ।
बाप रखुमादेविवरू विठ्ठलु रे ॥७॥
No comments:
Post a Comment