Showing posts with label S-किशोरी आमोणकर. Show all posts
Showing posts with label S-किशोरी आमोणकर. Show all posts

सोयरा सुखाचा विसावा SOYARA SUKHACHA VISAWA

सोयरा सुखाचा विसावा भक्तांचा ।
विठोबा निजाचा मायबाप ॥१॥

कृपाळू दीनांचा पळिभर न माझा ।
तोडर ब्रीदाचा साजे तया ॥२॥

काया-मनें-वाचा संग करा त्याचा ।
अनंत जन्मांचा हरेल शीण ॥३॥

नामा म्हणे आम्हां दीनांचे माहेर ।
हरी निरंतर ना विसंबे ॥४॥


Lyrics -संत नामदेव संत NAMADEV
Music -किशोरी आमोणकर KISHORI AAMONA
Singer -किशोरी आमोणकर  KISHORI AAMONA
Movie / Natak / Album -भक्तिगीत  BHAKTIGEET

या पंढरीचे सुख Ya Pandhariche Sukh

या पंढरीचे सुख पाहतां डोळां ।
उभा तो जिव्हाळा योगीयांचा ॥१॥

म्हणोनियां मन वेधलें चरणीं ।
आणिक त्यागुनी बुडी दिली ॥२॥

जनार्दनाचा एका धांवे लोटांगणीं ।
करी वोवाळणी शरीराची ॥३॥



Lyrics - Sant Eknath संत एकनाथ
Music - Kishori Amonkar किशोरी आमोणकर
Singer - Kishori Amonkar किशोरी आमोणकर

पाहतोसी काय आता पुढे,Pahatosi Kaay Aata

पाहतोसी काय ।
आतां पुढें करीं पाय ॥१॥

वरि ठेवूं दे मस्तक ।
ठेलों जोडुनि हस्तक ॥२॥


बरवें करी सम ।
नको भंगो देऊं प्रेम ॥३॥

तुका म्हणे चला ।
पुढती सामोरे विठ्ठला ॥४॥

पडिलें दूरदेशीं,Padile Door Deshi

पडिलें दूरदेशीं । मज आठवे मानसीं ॥१॥

नको हा वियोग । कष्ट होतात जीवासि ॥२॥दिनु तैसी रजनी । मज जाली गे माये ॥३॥

अवस्था लावुनि गेला । अजुनी कां न ये ॥४॥


गरुड-वाहना गंभीरा । येईं गा दातारा ॥५॥

बाप रखुमादेवी-वरा । श्रीविठ्ठला ॥६॥

जाईन विचारित रानफुला,Jain Vicharit Raan Phula

जाईन विचारित रानफुला
भेटेल तिथे ग सजण मला !

भग्न शिवालय परिसर निर्जन
पळसतरुंचे दाट पुढे बन
तरुवेली करतिल गर्द झुला

उंच पुकारिल मोर काननी
निळ्या ढगांतुन भरेल पाणी
लहरेल विजेची सोनसळा

वाहत येइल पूर अनावर
बुडतिल वाटा आणि जुने घर
जाईल बुडुन हा प्राण खुळा

जनी म्हणे पांडुरंगा,Jani Mhane Panduranga

जनी म्हणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जीवलगा ।
विनविते सांगा । महिमा साधुसंतांचा ॥१॥


कैसी वसविली पंढरी । काय महिमा भीमातीरीं ।
पुंडलिकाच्या द्वारीं । कां उभा राहिलासी ॥२॥


कैसा आला हा गोविंद । कैसा झाला वेणुनाद ।
येउनी नारद कां राहिला ॥३॥

कृपा करा नारायणा । सांगा अंतरींच्या खुणा ।
येऊं दे करुणा । दासी जनी विनवितसे ॥४॥

जनी जाय पाणियासी,Jani Jaay Paniyasi

जनी जाय पाणियासी । मागें धांवे हृषिकेशी ॥१॥

पाय भिजों नेदी हात । माथां घागरी वहात ॥२॥


पाणी रांजणांत भरी । सडासारवण करी ॥३॥

धुणें धुऊनियां आणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥

अवघा रंग एक झाला,Avagha Rang Ek Jhala

अवघा रंग एक झाला ।
रंगि रंगला श्रीरंग ॥१॥

मी तूंपण गेले वायां ।
पाहतां पंढरीच्या राया॥२॥

नाही भेदाचें तें काम ।
पळोनि गेले क्रोध काम ॥३॥

देही असुनि तूं विदेही ।
सदा समाधिस्त पाही ॥४॥

पाहते पाहणें गेले दुरी ।
म्हणे चोख्याची महारी ॥५॥



अवघा तो शकुन,Avagha to Shakun

अवघा तो शकुन ।
हृदयीं देवाचे चिंतन ॥१॥

येथें नसतां वियोग ।
लाभा उणें काय मग ॥२॥


संग हरिच्या नामाचा ।
शुचिर्भूत सदा वाचा ॥३॥

तुका म्हणे हरिच्या दासां ।
शुभकाळ अवघ्या दिशा ॥४॥