नाविका रे, वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे
सांजवेळ झाली आता पैल माझे गाव रे
आषाढाचे दिसं गेले, श्रावणाचा मास सरे, भादवा आला
माझा राऊ मनामंदी बोलुनि गेला
धाव घेई बघ माझे मन, नाही त्याला ठाव रे
नवा साज ल्यायले मी, गौरीवाणी सजले मी, चांदवा ल्याला
माझा जीवू उरामंदी फुलुनी आला
नाचते रे बघ माझे तन, संग त्याच्या भाव रे
मधूर गीत.
ReplyDeleteत्यात सुमन कल्याणपूर यांचा दैवी देणगी लाभलेला आवाज... Evergreen song.
अजूनही हे गाणे रोज ऐकावेसे वाटते. खूप गोडवा. गाण्यात आणि आवाजात.
ReplyDelete