कुणी निंदावे वा वंदावे,Kuni Nindave Va Vandave

कुणी निंदावे वा वंदावे, फोल पसारा सारा रे
कृष्णरूप जग झाले आता, मी तर वेडी मीरा रे

सदनी असो वा वनात किंवा, जळात राहो रणांत अथवा
नामघोष तो एकच हृदयी, राधाधर हरि मिलिंद रे

वृंदावन जन गोकुळ गुणिजन, सेवा ध्यान तपोधन सारे
इच्छा एकच मनात नांदे, हरिपावन मन जीवन रे

देहचि मंदिर, आत्मा गिरिधर, नयन सरोवर तीर्थचि रे
मीरेचे प्रभु मोहन श्रीधर, पाप विनाशी नामचि रे

No comments:

Post a Comment