दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
माय कैकयी ना दोषी नव्हे दोषि तात
राज्य त्याग कानन यात्रा ,सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा
अंत उन्नतीचा पतनी होई या जगांत
सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत
वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा
जिवासवे जन्मे मृत्यु जाड़े जन्मजात
दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेडया स्वप्निच्या फळांचा
तात स्वर्गवासी झाले बंधू ये वनांत
अतर्क्य ना झाले कांही जरी अकस्मात
मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा
जरा मरण यांतुन सुटला कोण प्राणिजात ?
दु :खमुक्त जगला कारे कुणी जीवनांत
वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयांचा
दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गांठ
क्षणिक तेवी आहे बाळा ,मेळ माणसांचा
नको आंसू ढाळु आता पूस लोचनांस
तुझा आणि माझा वेगळा प्रवास
अयोध्येत हो तू राजा ,रंक मी वणींचा
नको आग्रहाने मजसी परतवूस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे होऊ रे कृतार्थ
मुकुट कवच धारण करि कां वेष तापसाचा
संपल्याविना ही वर्षे दशोत्तरी चार
अयोघयेस नाही येणे सत्य हे त्रिवार
तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा
पुन्हा नका येऊ कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवी तू लोभी अयोध्या पुरीचा
Music -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Singer -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Movie / Natak / Album -भक्तिगीत BHAKTIGEET
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
माय कैकयी ना दोषी नव्हे दोषि तात
राज्य त्याग कानन यात्रा ,सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा
अंत उन्नतीचा पतनी होई या जगांत
सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत
वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा
जिवासवे जन्मे मृत्यु जाड़े जन्मजात
दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेडया स्वप्निच्या फळांचा
तात स्वर्गवासी झाले बंधू ये वनांत
अतर्क्य ना झाले कांही जरी अकस्मात
मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा
जरा मरण यांतुन सुटला कोण प्राणिजात ?
दु :खमुक्त जगला कारे कुणी जीवनांत
वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयांचा
दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गांठ
क्षणिक तेवी आहे बाळा ,मेळ माणसांचा
नको आंसू ढाळु आता पूस लोचनांस
तुझा आणि माझा वेगळा प्रवास
अयोध्येत हो तू राजा ,रंक मी वणींचा
नको आग्रहाने मजसी परतवूस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे होऊ रे कृतार्थ
मुकुट कवच धारण करि कां वेष तापसाचा
संपल्याविना ही वर्षे दशोत्तरी चार
अयोघयेस नाही येणे सत्य हे त्रिवार
तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा
पुन्हा नका येऊ कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवी तू लोभी अयोध्या पुरीचा
Music -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Singer -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Movie / Natak / Album -भक्तिगीत BHAKTIGEET
Great song by the great gadima.....asa kaviraj punha hone nahi....
ReplyDeleteजीवनाचे सार ह्या एका कबितेत भरले आहे.
ReplyDeleteपराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
ReplyDeleteहे वाक्य माझ्या बुद्धीला पटत नाही.
कारण मानव हा कधीच पराधीन नव्हता.
वनवास भोगायचा की तो टाळायचा हे सर्वस्वी प्रभु रामाच्या आधीन होते. प्रभु सोबत जायचे की नाही हे सर्वस्वी सीता व लक्ष्मण यांच्या आधीन होते.
असो बाकी सर्व वाक्य रचना या स्वर्गीय रचना आहेत.
बाकी मतमतांतर असु शकतात.