निरोप कसला माझा घेता NIROP KASALA MAAJHA GHETA

निरोप कसला माझा घेता ?जेथे राघव तेथे सीता

ज्या मार्गी हे चरण चालती ,त्या मार्गी मी त्यांचा पुढती
वनवासाची मला न भीती ,संगे आपण भाग्य विधाता

संगे असता नाथा आपण प्रासदाहुन प्रसन्न कानन
शिळेस म्हणतील जन सिहांसन ,रघुकुलशेखर  वरी बैसता 

वनी श्वापदे क्रूर निशाचर ,भय न तयांचे मजसी तिळभर
पुढती मागे दोन धनुधर्र ,हे चाप त्यांकरी पाठिस भाता

ज्या चरणांच्या लाभासाठी ,दडले होते धरणी पोटी
त्या चरणांचा विरह शेवटी ,काय दिव्य हे मला सांगता ?

कोणासाठी सदनी राहू ? कां विरहाच्या उन्हांत न्हाऊ
कां भरतावर छत्रे पाहु ,दास्य करू कां कारण नसता

कां कैकयी वर मिळवी तीसरा ?कां  आपुल्याही  मनी मंथरा
कां छळिता मग वृथा अंतरा ?एकटिस मज कां हो त्यजिता 

विजनवास या आहे दैवी ,,ठाऊक होते मला शैशवी
सुखदू:खांकित  जन्म मानवी ,दू :ख सुखाने प्रीती लाभतां  

तोडा आपण मी न तोडिते ,शतजन्माचे आपुले नाते 
वनवासासी मी ही येते ,जाया -पति कां त्यात आणिता

मूक राहतां कां हो आता कितीदा ठेवु चरनी माथा
असेन चुकले कुठे बोलता क्षमा करावी जानकी नाथा

Singer -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Movie / Natak / Album -भक्तिगीत  BHAKTIGEET

No comments:

Post a Comment