नाम घेता मुखी राघवाचे NAM GHETA MUKHI RAGHAVACHEनाम घेता मुखी राघवाचे
दास रामाचा हनुमंत नाचे

अंजनी उदरी जन्मला
भक्षिण्या रवि धावला
धावणे वायुपरी ज्याचे

रूप मेरूपरी घेउनी
तरू पाहे सिंधू लंघुनी
करुनिया दहन लंकेचे

जमवुनी वानरे सारी
बांधिला सेतू सागरी
बळ महान बाहुबलीचे

नित रमे राम जपतपी
जाहला अमर तो कपी
गुण गाता रघुसेवकाचे

Lyrics -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Music -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Singer -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Movie / Natak  / Album -गीत GEET

No comments:

Post a comment