आपुल्या दया पादुका AAPULYA DYA PAADUKA

तात गेले माय गेली भरत आता पोरका
मागने हे एक रामा आपुल्या दया पादुका

वैनतेयाची भरारी काय मशका साधते ?
कां जगाचा भार कोणी अश्वपृष्ठि लादते ?
राज्य करने राघवाचे भरता शक्य कां ?

वंशरीती हेच सांगे थोर तो सिहांसनी
सान तो सिहांसिनी कां जेष्ठ ऐसा  काननी ?
दान देता राज्य कैसे या पदांचा सेवका ?

घेतला मी वेष मुणींचा सोडतांना देश तो
कैकयीसा घेऊ का माथी प्रजेचा रोष तो 
काय आदन्या आगळी हि तुम्हीच देता बालका ?

राम नाही चरणचिन्हे राहु दया ही मंदिरी
नगरसीमा सोडूनि मी राहतो कोठे तरी
भास्करांच्या किरणरेखा सांध्यकाळी दीपिका

चालवितो राज्य रामा दुरून तुम्ही येई तो
मोजितो संवत्सरे मी वाट तुमची पाहतो  
नांदतो राज्यांत तीर्थी कमलपत्रा सारखा 

सांगता तेव्हा न आले चरण जर मागुती
त्या क्षणी या तुच्छ तनुची अग्निदेवा आहुती
ही प्रार्थना ही कपाळी पाउलांची मृत्तिका

Singer -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Movie / Natak / Album -भक्तिगीत  BHAKTIGEET

2 comments:

  1. मुद्रितशोधन आवश्यक. उदाहरणार्थ जगाचा भार नाही तर गजाचा भार; राज्य करने नाही तर राज्य करणे. आणखीही दुरुस्त्या आहेत. उपक्रम प्रशंसनीय. अभिनंदन.

    ReplyDelete
  2. पादुका या स्थापितो मी दशरथाच्या आसनी
    याच देवी राज्यकर्ता कोसलाच्या शासनी चरणचीन्हे पुजूनी ही साधीतो मी सार्थका.हा परिच्छेद लिहिला नाही

    ReplyDelete