काय सांगु रातीच बारा वाजल KAY SANGU RAATRICH WAJAL BARA


टिक टिक टिक टिक टिक टिक
तुझा काळजाचा घड्याळात
किती वाजल ?ग किती वाजल
काय सांगु रातीच बारा वाजल !
झाली मध्यान रात ग बाई
अजुन रयाचा पत्ता न्हाई
वारा बी मेला फिरकना अनं
घामानं अंग मांझ लई भींजल
काय सांगु रातीच बारा वाजल
हिचा काळजाचा घड्याळात
 बारा वाजल धनी,बारा वाजल!
काटा सरकत जाई पुढ़
डाव्या डोळ्यांची पापणी उड़
 दार खिड़क्या बंद आसोनी
कोन्यात कुणीतरी कुजबुजल
बाई बाई कुजबुजल
काय सांगु रातीच बारा वाजल !
हिचा काळजाचा घड्याळात बारा वाजल
चोर कोन्यात होता उभा
त्यानं माझ्यावर धरला दबा
भिउनी सख्याला मिठी मरिली
बघुनी त्याला मांझ डोळ लाजल
काय सांगु रातीच बारा वाजल !


Lyrics - जगदीश खेबुडकर   JAGDISH KHEBUDKAR
Music -बाळ पलसुले  BAL PALSULE
Singer -उषा मंगेशकर  USHA MANGESHKAR
Movie / Natak / Album -कराव तस भराव KARAV TAS BHARAV

No comments:

Post a Comment