राया जरा घोडयाला घाला लगाम RAYA JARA GHODYALA GHALA LAGAM

लई चौखुर सुटलाय बघा
दरी डोंगरात देईल दगा
अन नीती कमरंचीसोडू नगा 
मुक्काम रहयला दूर साजना
हितच फुटला घाम
अहो राया
राया जरा घोडयाला घाला लगाम

लई मस्तिनं फुरफुर करतो
माती उकरून रिंगाण धरतो
अंदन मधनं झाडीत शिरतो 
अवती भवतिनं धुंदीत फिरतो 
नखरा ह्याचा लई धोक्याचा
न्यारंच ह्याचं काम       
 अहो राया 
राया जरा घोडयाला घाला लगाम
भ्या वाटतंया उतरा खाली 
नवेपणाची भोवळ आली
ह्या द्वाडानं किमया केली 
नाक घासतोया गुलाबी गाली
रगारागानं विकून टाका 
परत मागा दाम 
राया जरा घोडयाला घाला लगाम

Lyrics -जगदीश खेबुडकर JAGADISH KHEBUDAKAR
Music -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -ज्योतिबाचा नवस  JYOTIBACHA NAVAS

No comments:

Post a Comment