Showing posts with label S-अजय-अतुल. Show all posts
Showing posts with label S-अजय-अतुल. Show all posts

मोरया … मोरया …MORAYA ..MORAYA



हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया
तुझ्या इना मानसाचा जन्म जाई वाया
हे देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया
मोरया … मोरया … मोरया … मोरया …

ओंकाराचं रूप तुझं चराचरामंदी
झाड-येली-पानासंग फूल तू सुगंधी
भगताचा पाठीराखा, गरीबाचा वाली
माझी भक्ति- तुझी शक्ति एकरूप झाली
हे देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया
मोरया … मोरया … मोरया … मोरया …

आदि अंत तूच खरा, तूच बुद्धी दाता
शरण मी आलो तुला, पायावर माथा
डंका वाजं  दहा दिशी गजर नावाचा
संकटाला बळ देई अवतार देवाचा
हे देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया
मोरया … मोरया … मोरया … मोरया …

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यां-कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी

Lyrics -जगदीश खेबूडकर JAGADISH KHEBUDAKAR
Music -अजय गोगावले AJAY GOGAWALE
Singer -अजय-अतुल AJAY-ATUL
Movie / Natak / Album -उलाढाल (२००८) ULADHAL 2008

सारेगमप,SaReGaMaPa

गाईन गीत सुरेल नवे
जे रसिकांचे मन रिझवे
संगीताने जग भरले
हे स्वप्न स्वरांचे उलगडले
नाचले, रंगले, दंगले, गुंगले
तनमन गुणगुणले
सा रे ग म प
सा रे ग म प