Showing posts with label तुका झालासे कळस (१९६४). Show all posts
Showing posts with label तुका झालासे कळस (१९६४). Show all posts

पहाटेच्या या प्रहरी,Pahatechya Ya Prahari

पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरि हरि हरि

रात्र शेवटाला गेली उखा आभाळी उदेली
फुलारली झाडे-वेली, जाग वारियासी आली
वेळ शितळ साजिरी पक्षी गाती नाना परि

गेला दिस नाही येत काही करावे संचित

साधा आपुणा रे हीत नाम वाचे उच्चारित
नाम घेता घरिदारी उभा विठ्ठल कैवारि

सरे अंधाराचा पाश झरे मोकळा प्रकाश
मुखे करा नामघोष जाति जळोनिया दोष
तुका म्हणे जन्मावरि ठेवा तुळस मंजिरि

न्याहरी कृष्णाची घेउनी,Nyahari Krishnachi Gheuni

न्याहरी कृष्णाची घेउनी
निघाली गवळण वृंदावनी

वैशाख तापतो, ऊन न लागे तिला
टोचता कळेना काटाही पाऊला
हरीवेडी होउनी-
निघाली गवळण वृंदावनी

आजच्या पहाटे हाक मारल्याविना
श्रीरंग जाई तो घेउनिया गोधना
यमुनातटी चालली-
निघाली गवळण वृंदावनी

एकांत पाहुनी भेटुन मनमोहना
आपल्या करे ती भरवील दध्योदना
हनुवटी कुरवाळुनी-
निघाली गवळण वृंदावनी

काय तुझे उपकार,Kaay Tujhe Upkar

काय तुझे उपकार पांडुरंगा ॥
सांगो मी या जगामाजी आतां ॥१॥


जतन हें माझें करूनि संचित ।
दिलें अवचित आणूनियां ॥२॥


घडल्या दोषांचे न घाली भरी ।
आली यास थोरी कृपा देवा ॥३॥


नव्हतें ठाउकें आइकिलें नाहीं ॥
न मागतां पाहीं दान दिलें ॥४॥


तुका म्हणे याच्या उपकारासाटीं ।
नाहीं माझें गाठीं कांही एंक ॥५॥