वारियाने कुंडल हाले,Variyane Kundal Hale

वारियाने कुंडल हाले
डोळे मोडित राधा चाले

राधा पाहून भुलले हरी
बैल दुभवी नंदाघरी

फणस जंबिर कर्दळी दाटा
हाति घेऊन नारंगी फाटा

हरि पाहून भुलली चित्ता
राधा घुसळी डेरा रिता

ऐसी आवडी मिनली दोघा
एकरूप झाले अंगा

मन मिळालेसे मना
एका भुलला जनार्दना

2 comments:

  1. एकनाथ महाराजांचे भजन आहे श. मिसळपाव डॉट कॉम वर अर्थ पहा, फार सुंदर अर्थ आहे

    ReplyDelete