कशि केलीस माझी दैना
मला तुझ्या बिगर करमेना !
घडिभरी माझिया मना, चैन पडेना, झोप येईना,
मला तुझ्या बिगर करमेना !
तू राघु तुझी मी मैना
माझं रूप बिलोरी ऐना
अंगी इष्काचा आजार, करी बेजार, कमति होई ना,
चैन पडेना, मला तुझ्या बिगर करमेना !
तू हकीम होउनि यावे
एकांती औषध द्यावे
दे चुंबन साखरपाक , मिठीचा लेप, मजसि सजणा,
मनमोहना, मला तुझ्या बिगर करमेना !
No comments:
Post a Comment