तुझ्या पापण्यांच्या आत Tuzya Papnyanchya Aat


तुझ्या पापण्यांच्या आत काय साठले, दाटले ?
दोन ओठांच्या दलांत दंव कोणते गोठले ?

उपचाराचे बोलणे मध्ये तुटून थांबले
क्षण अशब्द रिकामे, युगाप्रमाणे लांबले
नेत्र मिळाले नेत्रांस, नीट केलेस कुंतल
जरा कापत्या करांनी घेसी ओढून अंचल

गोंधळल्या गालांवरी स्मित उमले अधुरे
शब्द डोकावती काही ओठांमधून घाबरे
उभे संकोचाच्या आड, त्याची दिसली सावली
लाल रंगत उषेची मेघांमध्ये न मावली
नको सांगुस कधिही, काय सांगायाचे आहे
अशा भावमोहनाचा अंत अक्षरात राहे

Lyrics - Kusumagraj
गीत    -    कुसुमाग्रज
Music - Shridhar Phadake
संगीत     -     श्रीधर फडके
Singer - Shridhar Phadke
स्वर    -     श्रीधर फडके
Album - Lilav
अल्बम    -    लिलाव

No comments:

Post a Comment