Showing posts with label S-रंजना जोगळेकर. Show all posts
Showing posts with label S-रंजना जोगळेकर. Show all posts

अशा या सांजवेळेला Asha ya Sanjvelela

अशा या सांजवेळेला सुखाचा गंध हा आला
रिकाम्या ओंजळीला ह्या फुलांचा भार का झाला

निळ्या पाण्यात चंद्राच्या बिलोरी हालती छाया
निळ्या अंधार लाटेचा किनारा पैंजणे झाला

कुठे त्या गाववेशीला दिव्यांचा कारवा हाले
मनाच्या स्वैर मोराचा पिसारा मोकळा झाला

पहाटे स्वप्‍नपक्षांनी किनारे झाकले दोन्‍ही
मिठीच्या वादळाकाठी उसासा चंदनी झाला

Lyrics - Anil Kamble   अनिल कांबळे
Music - Anand Modak     आनंद मोडक
Singer - Ranjana Joglekar     रंजना जोगळेकर

सजणा पुन्हा स्मरशील ना,Sajana Punha Smarshil Na

सजणा पुन्हा स्मरशील ना
साऱ्या खुणा, सजणा पुन्हा स्मरशील ना !

चकवून कुणा आले कोण
दिधले प्रिया चुंबनदान
कोणी कुणा, सजणा पुन्हा स्मरशील ना !

प्रीतीतले लाख बहाणे
तू मी नवे, खेळ पुराणे
मनमोहना, सजणा पुन्हा स्मरशील ना !

माघाची थंडी माघाची,Maghachi Thandi Maghachi

माघाची थंडी माघाची, थंडीची धुंदी थंडीची
थंडीचा फुललाय काटा, अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता ?

रोमारोमांत चांदणं फुललं, हो फुललं
तुमच्या मिठीत सपान झुललं, हो झुललं
राया कशाला खिडकी मिटता, अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता ?

मला कशानं आली जाग ?
भर थंडीत भिनली आग
मन चोरून मिशीत हसता, अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता ?

बघा शिवारी कणीस हललं, हो हललं
नव्या माघानं हो रसरसलं, रसरसलं
किती व्हटानं मोती टिपता, अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता ?

त्या प्रेमाची शपथ तुला,Tya Premachi Shapath Tula

ज्या अनुभुतीच्या स्पर्शाने अर्थ लाभला जगण्याला
त्या प्रेमाची शपथ तुला

सहवासातील खोटे रुसणे

अबोल्यातले ते झुरणे
मौनामधुनी मोहरणारे अहेतुकाचे ते हसणे
त्या हसण्याची, त्या रुसण्याची, त्या झुरण्याची शपथ तुला

मनोगतांची अधुरी गीते
मनोरथांची नि:श्वासिते
ती वचने त्या आणा-शपथा सारे का फसवे होते

त्या श्वासांची, त्या गीतांची, त्या शपथांची शपथ तुला

ज्या अनुभुतीच्या स्पर्शाने अर्थ लाभला जगण्याला
त्या प्रेमाची शपथ तुला

कधि कुठे न भेटणार,Kadhi Kuthe Na Bhetanar

कधि कुठे न भेटणार
कधि न काहि बोलणार
कधि कधि न अक्षरात
मन माझे ओवणार

निखळे कधि अश्रू एक
ज्यात तुझे बिंब दिसे
निखळे निःश्वास एक
ज्यात तुझी याद असे

पण तिथेच ते तिथेच

मिटुनि ओठ संपणार
व्रत कठोर हे असेच
हे असेच चालणार