माझिया मना जरा थांब,Majhiya Mana Jara Thamb

माझिया मना, जरा थांब ना
पाऊली तुझ्या माझिया खुणा
तुझे धावणे अन्‌ मला वेदना

माझिया मना, जरा बोल ना
ओळखू कसे मी हे तुझे ऋतू
एकटी न मी सोबतीस तू
ओळखू कशा मी तुझ्या भावना

माझिया मना, जरा ऐकना
सांजवेळ ही, तुझे चालणे
रात्र ही सुनी, तुझे बोलणे
उषःकाल आहे नवी कल्पनाNo comments:

Post a Comment