बेचैन हळव्या लाटा BAICHAIN HALVYA LATA

बेचैन हळव्या लाटा, शोध घेतात कुणाचा
नर्म रेतीत पसारा, ह्या निराकार ठश्यांचा

सांज शकुनाने भारल्या मौन माडांच्या सावल्या, भारलेल्या
गीत गातात कुणाचे, ठाव घेतात मनाचा
शोध घेतात कुणाचा ….

शुभ्र ताऱ्यांचा काफिला, दूर जाताना बोलला
सांगता हिच निशेची, हाच प्रारंभ उद्याचा
भास सांभाळ धुक्याचा


Lyrics -वैभव जोशी  VAIHAV JOSHI
Music -अवधूत गुप्ते AVADHUT GUPTE
Singer -वैशाली सामंत VAISHALI SAMANT
Movie / Natak / Album -गीत GEET

No comments:

Post a Comment