ASE KONI असे कोणीअसे कोणी हलक्याने हसे कोणी
बघताना परि कोणी दिसतच नाही
असे कोणी अपुले हे जसे कोणी
भासे का असे कोणी उमगत नाही
हाक कुणाची  कानी येते 
अलगद कोठे घेऊन जाते

असे कोणी हलक्याने हसे कोणी
बघताना परि कोणी दिसतच नाही
हे ना जरी ओळखीचे वाटते
हे का परि वाटते आपुले
असे कोणी हलक्याने हसे कोणी
बघताना परि कोणी दिसतच नाही

तुझे बहरणे तुझे निरखणे
किती हवेसे वाटते
तुझे निरखणे माझे बहरणे
ओळखीचे वाटते
असे कोणी हलक्याने हसे कोणी
बघताना परि कोणी दिसतच नाही

भास कि खरे हे सांग एकदा रे
मार्ग हा कोणता बोल ना  रे
साथ जन्मजन्माची साक्ष ही मनाची 
सांगते ही धरा बोलते आभाळ किती काय राणी
असे कोणी हलक्याने हसे कोणी
बघताना परि कोणी दिसतच नाही
असे कोणी अपुले हे जसे कोणी
भासे का असे कोणी उमगत नाही

बघता बघता जादू घडते
बघता बघता भूल पडते
बघता बघता सर ही झरते
बघता बघता मन मोहरते

Lyrics - SANDEEP KHARE संदिप खरे
Music -S.J.SURYA एस. जे.सूर्या
Singer -VAISHALI SAMANT,VISHWJIT JOSHI वैशाली सामंत ,विश्वजीत जोशी
Movie / Natak / Album -ISHQ WALA LOVE  इश्क़ वाला लव 

No comments:

Post a Comment