अंगणी माझ्या मनाच्या,Angani Majhya Manachya

अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले
दाटुनी आभाळ आले मेघ बरसू लागले
अशा चिंब ओल्या क्षणी

पुकारे तुझी साजणी !

चांदीची ही थेंब फुले या माळुनी येती सरी
आणि मातीच्या गंधाने भरती सरसर घागरी
धुंद नाचते उन्मनी
पुकारे तुझी साजणी !

गार वारा मन भरारा शिर्शिरी देही उठे
हा असा पाऊस आणि मी तुला शोधु कुठे
खोड ही तुझी रे जुनी
पुकारे तुझी साजणी !

4 comments:

  1. really heart touching

    ReplyDelete
  2. नवशिक्या साठी जरा आलाप देत जा ना.
    शिवाय राग कोणता? गाणे मस्तच

    ReplyDelete