भाग्य पांगळे भोग,Bhagya Pnagale Bhog

भाग्य पांगळे भोग भोगते, न्याय आंधळा भाळी
पाप-पुण्य मग असो कुणाचे दैव दुजाला जाळी

कधी न कळते दैव कुणाचे
काळ सांगतो ज्याचे त्याचे
वेळ साधुनी दैव वाढते सुख-दु:खाची थाळी

फूल चढे कधी प्रभुचरणावर
रडे कधी ते शवसरणावर
अपंग सगळे, हसे कुणी तर कुणी आंसवे ढाळी

दैवाचे हे उलटे फासे
फिरता घर मग फिरती वासे
ना ये सांगून कधी कुणाची येते अवचीत पाळी

No comments:

Post a Comment