काय या संतांचे,Kaay Ya Santanche

काय या संतांचे मानूं उपकार ।
मज निरंतर जागविती ॥१॥

काय द्यावें यांसी व्हावें उतराई ।
ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥२॥

सहज बोलणें हित उपदेश ।
करूनि सायास शिकविती ॥३॥

तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्तीं ।
तैसे मज येथ सांभाळित ॥४॥

No comments:

Post a Comment