संसारी या माझ्या अवघा,Sansari Ya Majhya Avagha

श्रीरघुनंदन तुझेच चिंतन सदैव मुखी तव नाम
संसारी या माझ्या अवघा तूच प्रभू श्रीराम !

तूच निर्मिले सुंदर हे घर, नभ मायेची त्यावर पाखर
रूप आगळे तुझे धनुर्धर, विश्वचि हे निज धाम
संसारी या माझ्या अवघा तूच प्रभू श्रीराम !

तुझिया चरणि अर्पुन तनमन, भावभक्तिचे हृदयी पूजन
मीच विसरते माझे मीपण, तुझेच अवघे भान
संसारी या माझ्या अवघा तूच प्रभू श्रीराम !

जीवनात या राम असावा, जन्मोजन्मी नित्य भजावा
तुझा लाभू दे मला विसावा हेच हवे वरदान
संसारी या माझ्या अवघा तूच प्रभू श्रीराम !

No comments:

Post a Comment